पाचोर्‍यात सोमवारपासुन शारदिय व्याख्यानमालेचे आयोजन

0

पाचोरा  — पाचोरा येथील नगरपरीषदेच्या शिक्षण विभाग व महात्मा गांधी वाचनालय यांचे संयुक्तविद्यमाने सोमवार पासुन शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून येथील हुतात्मा स्मारकात दररोज रात्री 8 वाजता व्याख्यानमाला होणार आहे.

पालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिक्षण सभापती हर्षाली दत्तात्रय जडे, बांधकाम सभापती भुषण वाघ, आरोग्य सभापती सतिष चेडे, पाणी पुरवठा समिती सभापती रंजना भोसले, गटनेत्या सुनिता किशोर पाटील, मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापती संगिता आनंद पगारे, महिला बालकल्याण सभापती मालती बापू हटकर, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, सहाय्यक ग्रंथपाल शाम ढवळे, ललित सोनार, गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात होणार्‍या शायदीय व्याख्यान मालेत सोमवार दि. 16 रोजी डॉ. प्रल्हाद लुलेकर (औरंगाबाद) – ’आजचे वर्तमानपत्र आणि फुले, आंबेडकरी विचार’, दि. 17 रोजी सुरेंद्र गुजराथी (संगमनेर) – ’एक अफलातुन, वेगवान मराठमोळा एकपात्री प्रयोग’ वाह क्या बात है, दि. 18 रोजी विकास नवाळे (सिन्नर) – ’छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र’, दि. 19 रोजी डॉ. मधुसूदन चेरेकर (लातुर) – ’महाराणा प्रताप चरित्र आणि कर्तृत्व’, दि. 20 रोजी सिमा देशपांडे उर्फ मरियम सैय्यद (पुणे) – ’जीवनाचा खरा उद्देश म्हणजेच यशाची गुरुकिल्ली’, दि. 21 रोजी शनिवारी शरद जाधव (सांगली) – हास्य यात्रा – विनोदी एकपात्री प्रयोग या विषयांवर व्याख्यान दिले जाणार आहे. कार्यक्रमास नगरसेवक संजय वाघ, राम केसवानी, वासुदेव माळी, महेश सोमवंशी, सुचेता वाघ, अस्मिता भालेराव, सिंधुबाई शिंदे, विजया शिंदे, विकास पाटील, अशोक मोरे, मनिष भोसले, हजराबी तडवी, रफीक बागवान, सईद बागवान, डॉ. भरत पाटील सह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.