ईंदाच्या राज्यध्यक्षपदी – स्वामी रेणापूरकर!

0

जळगाव – येथील निवासी जेष्ठ पत्रकार श्री वैजनाथ स्वामी रेणापूरकर याची राष्ट्रीय स्तरावरील  भारतीय भाषाई न्यूजपेपर्स असोशी  एशन नवी दिल्ली या संस्थेवर 4 डिसेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी हावडा (पश्चिम बंगाल) येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड संस्थेचे अध्यक्ष परेशनाथ यांनी घोषित केली.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष दै देशोंन्नती संस्थापक  महाराष्ट्राचे प्रकाशजी पोहरे कर्नाटक मध्यप्रदेश पश्चिम बंगाल येथील संस्थेचे उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. हि संस्था सर्व भाषाई वर्तमानपत्राच्या आर्थिक जाहिरातविषयक पोस्टल व येणार्‍या  दैनंदिन अडचणी  सोडविणारी हि एकमेव संस्था देशात आहे. संस्थेचे अध्यक्ष हे देशाची राजधानी दिल्ली येथील असलेमुळे वृत्तपत्राच्या अडचणी प्रभावीपणे सहज सोडवितात. प्रत्येक राज्यात जिल्ह्यातील समित्या नेमावयाच्या आहेत किंवा या संस्थेचे सभासद होण्यासाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य युनिटचे अध्यक्ष मो न 9422283544या नंबरला संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.