एकथनाथ खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0

मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी आमचे जवळचे संबंध आहेत. ४०-४५ वर्ष अनुभव असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात असावा अशी त्यांची इच्छा आहे. पण अद्याप मी त्याबद्दल काही निर्णय घेतला नसल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

“शरद पवार यांच्याशी अर्धा तास चर्चा झाली. जळगावमधील काही विकास कामांसाठी शिफारस हवी आहे. त्यासाठी मी शरद पवार यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील या योजनांना साडेसहा हजार कोटी रुपये लागणार असल्याचं सांगितलं. तसंच त्यांनीही शिफारस केली तर या योजनांच्या कामाला वेग येईल.”

Leave A Reply

Your email address will not be published.