आ.सावकारे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत?

0

राजकीय गुरू असलेल्या एकनाथराव खडसेंसह शिवसेनेत प्रवेशाची चर्चा : 11 वर्षात करणार तिसर्‍यांदा पक्ष बदल

जळगाव  विशेष प्रतिनिधी

भुसावळ येथील भाजपाचे आमदार संजय सावकारे तिसर्‍यांदा पक्ष बदल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. आपले राजकीय गुरू एकनाथराव खडसे यांच्यासह आ.सावकारे भाजपाला जय श्रीराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता मुंबईत होवू लागली आहे. दरम्यान, याबाबत आ.सावकारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

भाजपामध्ये सद्या विजनवासात असलेल्या एकनाथराव खडसे यांनी अचानक आपल्या राजकीय हालाचाली वाढविल्या आहेत. काल दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. यावरून नाथाभाऊ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची उघळ चर्चा राज्यात सुरू झाली आहे.

पक्षांतर करायचेच असेल तर एकटे करण्याऐवजी पक्षातील नाराजांची मोट बांधण्यासाठी खडसेंचे प्रयत्न सुरू आहेत. अशात खडसेंनी सेना प्रवेशाचा निर्णय घेतलाच तर जिल्ह्यातील राजकीय चित्र काय असले याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात नाथासमर्थकांना अडगळीत टाकण्यात आले असल्याने पक्षांतराचा निर्णय झालाच तर धमाकेदार व्हावा यासाठी भुसवाळचे आ.संजय सावकारे यांना सोबत घेण्याची तयारी श्री.खडसे यांनी केली आहे.

श्री.खडसेंचा शब्द टाळण्याची हिम्मत आ.सावकरे दाखविणार नाही. मात्र, पक्षांतर करायचे झालेच तर आमदारकीवर पाणी सोडावे लागणार हा त्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत नाथाभाऊं  आणि उध्दव ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. संजय सावकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि रिक्त होणार्‍या भुसावळच्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीवर पुन्हा निवडणूक  पान 2 वर

ठाकरे – खडसे यांच्या भेटीत आ.सावकारेंच्या पुर्नवसनाची चर्चा?

भाजपाचे नाराज नेते एकनाथराव खडसे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. कोणत्या मुद्यावर चर्चा होणरा हे नाथाभाऊंनी सांगण्यास नकार दिला असला तरी आ.सावकारे यांनी राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे राजकीय पुर्नवसन कसे करायचे? या विषयावर सुध्दा चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे. भाजपाचा राजीनामा देवून शिवसेनेकडून सावकारे निवडून आल्यास शिवसेनेचेही संख्याबळ वाढणार आहे हे विशेष.

Leave A Reply

Your email address will not be published.