शेतकऱ्याची १ लाख ६७ हजारात ऑनलाईन फसवूणक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

म्हसावद येथील शेतकऱ्याच्या किसान क्रेडीट कार्डचे काढलेली रक्कम भरण्याच्या नावाखाली १ लाख ६८ हजार ८०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शेतकरी निंबा ठाकरे (वय ६८) हे शेतकरी आहे. शेती करून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. निंबा ठाकरे हे २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घरी झोपलेले असतांना त्यांना एका नंबरवरून फोन आला. आपणी किसान क्रेडीट कार्ड मधून बोलत असल्याचे सांगून, तुम्ही अजून पर्यंत किसान क्रेडीट कार्डची रक्कम भरलेली नाही. असे सांगितले. त्यावर ठाकरे यांनी सांगितले की आम्ही रक्कम भरलेली आहे. असे सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून कार्डचा नंबर मागितला आणि आलेला ओटीपीच्या मदतीने सुमारे १ लाख ६७ हजार ८०९ रूपये ऑनलाईन काढून घेतले.

दोन दिवसानंतर त्यांना खात्यातून रक्कम गेल्याचे समजले. निंबा ठाकरे हे गुरूवार २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसीत धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रविंद्र गिरासे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.