शेंदुर्णीत शनिवारी नगरपंचायतीच्या वतीने कोविड लसीकरण; २ हजार डोस उपलब्ध

0

शेंदुर्णी, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी शनिवारी मोफत कोवीड लसीकरण आयोजित करण्यात आले असुन पारस मंगल कार्यालयात हे लसीकरण होणार असुन दोन हजार लसी उपलब्ध आहेत.

तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने बहुतांश नागरिक पहिल्या व दुसऱ्या लसीपासुन अद्याप वंचित आहेत. शेंदुर्णीत लोकसंख्येच्या मानाने लसी कमी प्रमाणात येत आहे. भल्या पहाटे पासुन नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नंबर लावतात. कुपन दिल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण सुरू आहे. मात्र गावाची लोकसंख्या लक्षात घेता अधिक लसी उपलब्ध व्हावे अशी मागणी होत होती. याचाच विचार करता शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने हे भव्य कोविड लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शनिवारी पारस मंगल कार्यालयात ही कोविड लसीकरण होणार असुन तब्बल दोन हजार कोविड लस उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले, परिवाराचे व गावाचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी याचा लाभ घ्यावा. लसीकरणासाठी येतांना आधारकार्ड सोबत आणायचे आहे.
तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन शेंदुर्णी नगरीच्या नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे, उपनगराध्यक्षा सौ. चंदाबाई अग्रवाल मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.