शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने केलेले काळे कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे- ॲड. साहेबराव मोरे

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहर व तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधक पारित केलेले ०३ काळे कायदे रद्द करण्याबाबत तहसीलदार राजेश सुरडकर यांना आज निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले काळे कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे. भारतातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा याकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पुकारलेल्या बंदला पाठींबा देत आ. राजेश एकडे यांच्या नेतृत्वात मलकापूर शहर व तालुका सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले. तरी सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले तीन काळे कायदे  तात्काळ रद्द करून न्याय देण्यात यावा अशी मागणी महामंत्री मा. राष्ट्रपती महोदय, भारत सरकार यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनावर ॲड. साहेबराव मोरे, न.प.उपाध्यक्ष हाजी रशिदखाॅ जमादार, रा.काॅ नेते संतोषभाऊ रायपुरे, बंडूभाऊ चवरे, तुषारभाऊ पाटील, अँड.संजय वानखेडे, महादेवराव गायकवाड, संभाजी शिर्के, प्रवीण क्षीरसागर, अरुण अग्रवाल, डॉ. अशोकराव सुरडकर, बाळूभाऊ पाटील, सलीम कुरेशी, युसुफ खान, सिद्धांत इंगळे, तुषार साबळे, ज्ञानदेव हिवाळे, ज्ञानदेव तायडे, छगन चौधरी, ईश्वर भदाले, जाकीर मेमन, सनाउल्ला जमादार अजगर जमादार, उस्मान मास्टर, रउफ शेठ, गजेंद्र सोनवणे, गजुभाऊ डवले, संजय जाधव, प्रल्हाद ढोले, युवराज रायपुरे, तेजस राणे, शुभम लाहुडकर, अतुल खोडके, संदीप चौरे, कलीम पटेल, कैलास ताठे, अश्रफ खान पेंटर, शरद संतोष मोरे, महेश शिंदे, भूषण सनीसे, संजय पाटील, सूरज धांडे, उखर्डा तांदुळकर, विनोद बिऱ्हाडे, मयूर नरवाडे व समाधान इंगळे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.