तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील सिद्धार्थ नगरामध्ये तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर संशयित आरोपीचे नाव सागर पुनम कंडारे (वय २४, रा. सिद्धार्थनगर रामेश्वर कॉलनी) असे आहे. सागर कंडारे हा शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात हातात ३० इंच लांबीची लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारी यांना मिळाली.

या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस नाईक सुधीर साळवे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, इमरान शेख यांनी रामेश्वर कॉलनीत रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना संशयित आरोपी सागर कंडारे याला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळून ३० इंच लांबीची लोखंडी तलवार हस्तगत केली असून  याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इम्रान बेग यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर कंडारे याच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.