आजपासून ‘या’ अँड्रॉईड फोनवर चालणार नाही Google Maps, YouTube, Gmail सह गुगलचे कोणतेही अ‍ॅप..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुगलने अँड्रॉईड फोनचा वापर करणार्‍या यूसर्जसाठी वाईट बातमी दिली आहे. कारण गुगल आता 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमीच्या व्हर्जनवर चालणार्‍या अँड्रॉईड फोनवर  साइन-इन सपोर्ट बंद करत आहे. गुगलच्या कम्यूनिटी पेजवरून समजते की, हा बदल 27 सप्टेंबर म्हणजे आजपासून लागू केला जाईल. गुगल क्रोममधून करू शकता साइन-इन.

जुने फोन वापरणार्‍या यूजर्सला सप्टेंबरनंतर सुद्धा गुगल अ‍ॅप्सचा वापर सुरू ठेवण्यासाठी किमान अँड्रॉईड 3.0 हनीकॉम्बमध्ये अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. हे सिस्टम आणि अ‍ॅपल लेव्हल साइन-इनला प्रभावित करेल, परंतु यूजर्सला आपल्या फोनच्या ब्राऊजरच्या माध्यमातून जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राईव्ह, यूट्यूब आणि इतर गुगल सेवांमध्ये साईन इन करता येऊ शकते.

काही दिवसांपूर्वी 9to5Google ने आपल्या रिपोर्टमध्ये त्या युजर्ससाठी पाठवलेल्या ईमेलचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे, जे या बदलामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. अशा यूजर्सची संख्या खुपच कमी आहे जे अँड्रॉईडचे खुपच जुने व्हर्जन वापरत आहेत.गुगल हे बदल यूसर्जच्या अकाऊंट सिक्युरिटी आणि सिक्युरिटीसाठी करत आहे.

27 सप्टेंबरपासून, अँड्रॉईड व्हर्जन 2.3.7 आणि त्यापेक्षा कमीवर चालणार्‍या फोनवर यूजर्स जेव्हा कधी लोक केलेल्या कोणत्याही गुगल अ‍ॅपमध्ये साईन-इन करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांना युजरनेम किंवा पासवर्ड  एरर दिसेल.

हा ईमेल अशा काही यूजर्ससाठी एक इशारा म्हणून दिसू शकतो, जे अजूनही जुने सॉफ्टवेयर व्हर्जनचा वापर करत आहेत. अशा यूजर्सला सॉफ्टवेयर अपडेट करणे किंवा फोन स्विच करण्याची विनंती केली जात आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 27 सप्टेंबरच्या नंतर जुन्या अँड्रॉईड व्हर्जनच्य यूजर्सला जीमेल, यूट्यूब आणि मॅप्ससारखे गुगल प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक एरर दिसेल. जर यूजर्सने नवीन गुगल अकाउंट बनवण्याचा किंवा फोन फॅक्टरी रिसेट करून पुन्हा साईन इन करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना फोन स्क्रीनवर एरर दिसेल. नवीन पासवर्ड बनवणे, आणि पुन्हा साईन इन केल्यानंतर सुद्धा एरर दिसत राहील.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.