शिवसेनेचा गद्दार मी नाही अनिल परब; रामदास कदम यांचे गंभीर आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेतील अंतर्गत कलह आता समोर येत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम हे आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन अनिल परब यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल परब यांनी माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले. ते राष्ट्रवादीचे संजय कदम यांना मातोश्री वरती घेऊन गेले, पण उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाही. योगेशने दोन वर्ष फोन केले, मात्र एकही कॉल त्यांनी उचलला नसल्याचे ते म्हणाले.

रामदास कदम म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता, म्हणून तो पाडला गेला. माझ्या काही कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणा केली. त्यांच्या मागे कोण होते, हे मला माहित होते. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगतो किरीट सोमय्या यांच्याशी मी कधीच बोललो नाही. मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केले नाही.

तसेच रामदास कदम म्हणाले की, माझ्या संदर्भात तीन चार महिन्यापासून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु आहे. सर्वांना माझी भूमिका माहीत व्हावी म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही. अनिल परबांनी मुंबईतून निवडून येऊन दाखवावे. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून ते राष्ट्रवादीच्या संजय कदमांना मातोश्रीवर घेऊन आले. पण त्यांचे उद्धवजींनी ऐकले नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यावर सुडाच्या भावनेने काम केले, असे ते म्हणाले.

कदम म्हणाले की, मी संजय कदम यांना मोठे केले. पण त्याने पक्ष सोडल्यानंतर भगवा झेंडा पायाखाली तुडवून जाळला. त्यांना आता हाताशी धरले जात आहे. आमचे निष्ठावंत उदय सामंत यांना बोलावले. आता आम्हाला त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागत आहे. अनिल परब शिवसेनेला गहाण ठेवत आहेत. मग गद्दार कोण आहे, असा सवाल त्यांनी केला. एसटी कर्मचारी संप सुरु आहे आणि आत्महत्या होत आहेत. पण अनिल परब यांना वेळ नाही. अनिल परब यांची भाषा अशी आहे की ते राष्ट्रवादी नेता म्हणून बोलत आहेत. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगत आहेत. 52 वर्ष आम्ही या पक्षासाठी खर्च केले असल्याचे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.