विहिरीत पडलेल्या नंदीला एकनिष्ठानी दिले जीवनदान

0

खामगांव  | प्रतिनिधी

गौ सेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशनच्या गौ-रक्षकांनी विहिरीत पडलेल्या नंदीला वेळेवर काढून दिले जीवनदान. हकीकत अशी आहे आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान सिव्हील लाईन स्थित डॉ कविश्वर यांच्या घरा जवळील ६० फुट विहिरीत एक नंदी पडलेले होते घटनेची माहिती नगरसेवक भुषण शिंदे व जगदीश जोशी यांनी फोन द्वारे देताच एकनिष्ठा गौ-रक्षक सुरजभैय्या यादव, गब्बू गुजरीवाल १० मिनिटा मध्ये पोहचले व आपल्या जीवाची परवा न करता विहिरीत उतरले तसेच अथक परिश्रम घेऊन नंदीला कुठलीही ईजा न होता दोरीच्या सहाय्याने विहिरीतून अवघ्या १५ मिनिटात नंदीला सुखरूप बाहेर काढून दिले जीवनदान या गौ-सेवेत सुरजभैय्या यादव, गब्बू गुजरीवाल, भुषण शिंदे, गणेश सरोदे, प्रज्वल थोटांगे, चेतन तंबोले, शुभम संगेले, ओंकार गायकवाड, सुरेश छापरवाल, गोपाल गायकवाड, संजय गवई आदि गौ-रक्षकांनी सहकार्य केले अशी माहिती गणेश सरोदे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.