विवाहितेची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील वंदना विजय पाटील (वय ४३) या विवाहितेला ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजताच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (मो. ७८६६९९२३१८) एटीएम पिन तयार करून देतो म्हणून संदेश आला. तेव्हा वंदना विजय पाटील यांच्याकडून बॅंक खात्याची सर्व माहिती घेतली. व ॲनी डेस्क नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून खात्यातुन ४९,९९९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वंदना विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-४२० व आयटी ॲक्ट ६६ (सी) प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास स्वत पोलिस निरीक्षक के. के. पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.