वन विभागाकडून ३१ हजार किमतीचा सागवान लाकूड जप्त

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील हरिपुरा व जामुनझिरा रस्त्यालगत  विनापरवानगी सागवान लाकूड आढळून आले आहे. ही कारवाई जळगाव वन विभागाच्या पथकाने केली असून, ३१  हजार रुपये किमतीचे सागवान लाकूड जप्त केले आहे.

तालुक्यातील हरीपुरा ते जामुनझीरा रस्त्यालगत केळीच्या शेताजवळ खड्ड्यात असलेल्या  केळीचे पालापाचोळ्यात लपवलेला  विनापरवानगी सागवान इमारतीचे  चौकटी लाकूड आढळून आले. लाकडांची मोजमाप केली असता ३१ हजार रुपये किमतीचे असल्याचे समोर आले.

ही कारवाई वनसंरक्षक डी. डब्ल्यू. पगारे, उपवनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा, विभागीय वन अधिकारी यु. जी. वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक पी. व्ही. हाडपे, व्ही. टी. पदमोर, वनपाल राजू शिंदे, रवींद्र तायडे, असलम खान, रज्जाक तडवी, वनमजूर अशोक जिरीमाळी, शिवाजी इंगळे, राजू भोईटे यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.