आनंद बागमार आणि मयुरी बागमार यांच्या 15 उपवासाची सांगता

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथे आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या शिष्या प्रति दर्शनाची मारसा यांचा चातुर्मास चालू आहे.  या चातुर्मासामध्ये अनेक तपश्चर्या होत आहेत.  वडाळा येथील कपाशीचे व्यापारी आणि विकासाचे माजी चेअरमन सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत प्रदीप मुलचंद बागमार यांचे चिरंजीव आनंद बागमार आणि मयुरी बागमार यांनी पंधरा उपवास करण्याचा संकल्प केला.

शनिवारी त्या दोघांची पचकावणी संपन्न झाली.  याप्रसंगी  जैन स्थानक चाळीसगाव या ठिकाणी सकल जैन समाजाचे मान्यवर उपस्थित होते. दोघी भावंडांनी अशाप्रकारे 15 उपवास करून सय्यम मार्ग स्वीकारून एक आदर्श निर्माण केला आहे. सर्व समाज बांधव दोघी भावंडांचे कौतुक करून आनंद व्यक्त केला.  याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजू दादा देशमुख तसेच माननीय प्रदीप दादा देशमुख आणि इतर सर्व इतर मान्यवरांनी दोघी भावंडाचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.