लोकसभेसाठी तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधील ४२ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर

0

कोलकाता ;– आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यासोबतच आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार आहे. ही यादी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे.

या उमेदवाऱ्यांच्या यादीत क्रिष्णनगरमधून महूआ मोईत्रा, दमदममधून सौगता रॉय, बारासातमधून काकोली घोष दस्तीदार, बशीरहाटमधून हाजी नूरुल इस्लाम, जयनगरमधून प्रतिमा मंडल, मथुरापूरमधून बापी हलदर, डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी, जाधवपूरमधून शायनी घोष, कोलकाताहून मामा रॉय, दक्षिणेतून सुदीप रॉय. कोलकाता उत्तर बंधोपाध्याय, हावडा येथून प्रसून बॅनर्जी फुटबॉलपटू, उलुबेरियातील साजदा अहमद, श्रीरामपूर येथील कल्याण बॅनर्जी, हुगळीमधून रचना बॅनर्जी, आरामबागमधून मिताली बाग आणि तमलूकमधून देबांशू भट्टाचार्य यांचा समावेश आहे.

इंडिया आघाडीच्या जागावाटपावरून सुरू असलेला गोंधळात टीएमसीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.या यादीत महत्वाचा नाव माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या नावचाही समावेश आहे. ते बहरामपूरमधून निवडणूक लढणार आहे. त्यांचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.