लोकसभेत रस नाही; मनसे

0

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाआघाडीत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र मनसेला लोकसभा निवडणूक लढण्यात रस नसून विधानसभेसाठी अधिक रस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची याबाबत चर्चा झाली. यावेळी लोकसभा लढण्यास मनसे इच्छुक नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील एका कार्यक्रमात मुलाखत घेतली होती. त्यानंतर या दोन नेत्यांमधील जवळीक कायम चर्चेत राहिली. यानंतर मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा मनसेला विधानसभेसाठी अधिक रस आहे. मनसेनं सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीमध्ये मनसे सामील होणार का? अशी चर्चा होती. पण, त्याबाबत अद्याप तरी काहीही स्पष्ट झालेलं नाही.

मात्र उत्तर भारतीयांचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसला देशातील हिंदी पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.