कागदपत्रे सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार – शरद पवार

0

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर टीका केली. देशाच्या संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रे चोरीला जात असतील तर हे सरकार इतरांना सुरक्षा काय पुरवणार, असाही खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. ना खाऊंगा, ना खाने दुंगा वायद्याचं काय झाले अशी विचारणाही यावेळी शरद पवार यांनी केली.

दरम्यान, शरद पवार यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर विरोधीपक्षांची बैठक झाली तरी पंतप्रधान आपले कार्यक्रम सभांमधून विरोधकांवर हल्ला करत होते, मतं मागत होते, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. मोदी सरकार आल्यापासून तीन वर्षाच्या कार्यकाळात ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगताना शेतकऱ्यांच्या शेताला हमीभाव मिळत नसल्याची खंत शरद पवार यांनी दिली आहे. कर्जमाफीचे नियम क्लिष्ट करण्यात आले असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. नोटाबंदीनंतर 15 लाख लोक बेरोजगार झाले. तसंच 2 कोटी जणांना रोजगार मिळणार होते त्याचं काय झालं असा प्रश्नही शरद पवार यांनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.