मुक्ताईनगर येथे ओपन स्पेस गार्डनचे खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन

0

मुक्ताईनगर : नगरपंचायत विशेष अर्थसहाय्य सन २०१७-१८ योजनेतून येथील गोदावरी नगरमधील वार्ड क्र.१७ मध्ये असलेल्या ओपन स्पेस गार्डनचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते कुदळी मारून व फलकाचे अनावरण करून भूमिपूजन करण्यात आले. यात जिम जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांचे खेळणे, सुंदर देखावा व लॉन यात समाविष्ट असणार आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, अनिल पाटील, नगरसेवक बबलू कोळी, मुकेश वानखेडे, नगरसेवक प्रवीण पाटील, शिवाजी मालवेकर, संजय वाडीले, महेंद्र मालवेकर, शिवाजी पाटील, जीवन मोरे, नगरसेवक निलेश शिरसाट, नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्यामकांत गोसावी, वैशाली वाडीले, शकुंतला मालवेकर, निशा मालवेकर, मीना पाटील, संगीता मोरे, डॉ.विवेक तायडे, वंदना बडगुजर, निलेश मालवेकर, भाजपा सरचिटणीस व भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.