लोकसभा निवडणुकीत एक तरी जागा द्या; रामदास आठवलेंची मागणी

0

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीत कमीत कमी एक तरी जागा द्या, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. सोमवारी अमित शाह आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा केली आहे. लोकसभावेळी ४८ जागांपैकी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप करताना मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचा विचार न केल्यामुळे रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

जर आमच्या पक्षाला एकही जागा न दिल्यास शिवसेना – भाजपाला महाराष्ट्रातील दलित मताचा फटका बसेल. राज्यात आणि केंद्रात एनडीएला पुन्हा सत्तेत यायचे असल्यास आरपीआयची मदत लागेल. त्यामुळे आमच्या पक्षाला लोकसभामध्ये एक तरी जागा द्या. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेईल, असे आठवले म्हणाले.  आंबेडकरी जनता माझ्यासोबतच आहे असा दावा करून, आगामी निवडणूक दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत असा निर्धार रामदास आठवले यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.