जामनेरात पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

0

जामनेर –

काश्मीर मधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काल दि.18 रोजी जामनेर शहरात स्वयंस्फुर्तीने बंद पाळण्यात आला.यावेळी शासकीय कार्यालय,बँका,हास्पिटल,मेडिकल वगळून सर्व दुकाने व व्यापार पेठ सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी परीस्थिवर नियंत्रण ठेऊन होते.

Leave A Reply

Your email address will not be published.