रेडक्रॉसच्या गोदामातील ७५ हजारांचे साहित्य चोरी

0

जळगाव :- रेडक्रॉस सोसायटीच्या खासगी गोदामात वर्षभरापूर्वी ठेवलेले ब्लड स्टोरेजसाठी लागणारे ७५ हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे.

रेडक्रॉसला जिल्ह्यातीलरेडक्रॉसला जिल्ह्यातील काही तालुक्यात ब्लड स्टोअरेज सेंटर सुरू करण्यासाठी मागवलेले साहित्य सोसायटीचे चेअरमन तथा उद्योजक विनोद बियाणी यांच्या एमआयडीसीतील एम सेक्टर १७ या ठिकाणी असलेल्या गोदामात १ डिसेंबर २०२२ पासून विना भाडेतत्त्वावर ठेवले होते. या सामानाची खातरजमा सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी यांनी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता केली होती. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी सोसायटीचे चेअरमन विनोद बियाणी यांनी फोन करून तिवारी यांना गोदामातील साहित्य काढलेले दिसत असल्याचे कळविले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी तिवारी यांनी जाऊन पाहिले असता गोदामाचे शटरची कुलूप तोडून आतील 75 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले. या चोरीबाबत सोसायटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांना कळविले त्यांच्या सूचनेनुसार प्रशासकीय अधिकारी तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.