राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सावदा येथील दोन मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

राजेंद्र भादू डोळे ( वय ४२, रा. पाटीलपुरा सावदा, ता. रावेर) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय ५३, रा. सावदा) हे दोन्ही जण मोटारसायकलवरून जळगावकडे कामानिमित्त येत होते. दरम्यान, रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हे दोन्ही जण जागीच ठार झाले.

सदर  अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.