राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केलीय. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहेत. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही ते म्हणाले आहेत. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.