माजी मंत्री महाजनांच्या निवासस्थानी पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी..

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजपा पक्ष जगाच्या पाठीवर आगामी काळात महासत्ता म्हणून पुढे येणार असल्याचे मत भाजपा नेते आ. गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. आज स्वर्गीय पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन आ .गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी करण्यात आले. निस्वार्थपणे पंडीतजींच्या विचारांप्रमाणे  देशासाठी गोर गरीब जनतेसाठी काही केले पाहीजे, विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहीजे हा विचार ठेवून त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी रुजवलेले बीजाचे आज वटवृक्ष झाले आहे.

व्हिडिओ बातमी……👇

 

त्यांनी घेतलेल्या त्या काळच्या मेहनतीमुळे आपण आज भाजपाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून मिरवत आहोत. त्यांनी दिलेले विचार मार्गदर्शन या विचाराने प्रत्येकाने वागावे, गोर गरीबाची सेवा करून त्यांच्या अडी अडचणी सोडवाव्या असे मत यावेळी आ. गिरीश महाजन यांनी मांडले.

यावेळी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, जितेंद्र पाटील, उल्हास पाटील, जे के चव्हाण, दिपक तायडे, दत्तात्रय सोनवणे, सुहास पाटील, आतिष झाल्टे, छगन झाल्टे, जितू पाटील, कैलास पालवे, दिपक तायडे, विजय शिरसाठ यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते .

Leave A Reply

Your email address will not be published.