राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मुशीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती अद्याप  समोर आलेली नाही. बॉम्बे हॉस्पिटलच्या बाराव्या मजल्यावर, डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

काही दिवसांपूर्वी  भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.