लोहारी शिवारातील हात भट्टया नेस्तनाबूत

0

 शिंदाड, ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  

येथून जवळच असलेले  लोहारी  शिवारातील नालेकाठावरअसलेल्या  दारूच्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. असे सहायक पोलीस निरीक्षक कुष्णा भोये यांनी सांगितले. या कारवाईचे परिसरातील जनतेने जोरदार स्वागत केले आहे.

साहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भाेये यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच अवैध धंद्या विरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे . या धाडसी कारवाईमुळे ज्या  ठिकाणी अवैध धंदे बोकाळले आहेत. त्या  ठिकाणच्या नागरिकांनी कृष्णाभोये यांना गुप्त माहिती देण्यास सुरुवात केले आहे. त्यामुळेच कारवाई शक्य होत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

त्यांना गुप्त माहिती मिळाल्याच्या  खबरीवरून सपोनि कृष्णा भोये यांच्यासोबत पोलिस रणजीत पाटील, अरुण राजपूत, रवींद्रसिंग पाटील, संदीप राजपूत, सचिन वाघ आदींच्या पथकाने गोपनीयता पाळून लोहारी शिवारातअसलेल्या नालेकाठी गावठी हातभट्टी चालवत असताना धाड टाकली.  त्याची हातभट्टी नेस्तनाबूत करण्यात आली.

यावेळी  भट्टीवरील कच्चे रसायन नष्ट  करण्यात आले. कलम ६५ अन्वये एकाआरोपीवर गुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आमच्या हद्दीतील एकही अवैध धंदा सुरू राहणार नाही. अशी ग्वाही सपोनि व त्यांच्या पथकाने दिली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.