रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपात प्रवेश

0

मुंबई :-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मुलगा रणजितसिंग मोहिते-पाटलांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रणजितसिंह भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज मुंबईत वानखेडे स्टेडियम शेजारी गरवारे सभागृहात त्यांचा भाजपा प्रवेश पार पडला. यावेळी माळशिरस पंचायत समिती सभापतींसह अन्य पदाधिकारीही भाजपात डेरेदाखल झाले. सातारा, सोलापूर, अकलूज येथील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांबरोबरच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन आदींची उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.