भुसावळात शिवजयंतीनिमित्त मोटरसायकल रॅलीचे आयोजन

0

भुसावळ :- येथील शंभुराजे ग्रुपतर्फे शनिवारी दि.२३ रोजी शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे व प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात सकाळी ९ वाजता ‘मोटर सायकल रॅली’काढण्यात येणार आहे. रॅलीस रिंग रोड वरील गडकरी नगरातील शंभूराजे चौकातून प्रारंभ होईल. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शंभूराजे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.