मुक्ताईनगर येथे ‌मेहुण्याने केला शालकाचा‌ कुऱ्हाडीने खून

0

 मोहन मेंढे, मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरात रात्री खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.  विशाल‌ वामन ठोसरे (अंदाजे वय २४) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

मुक्ताईनगर येथील रहिवासी  विशाल‌ वामन ठोसरे या तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.  या खूनाप्रकरणी मयत तरुणाचा  शालक विजय चैत्राम सावकारे ‌याच्यावर  संशय व्यक्त केला जात आहे. या तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते. सदर घटना घडली तेव्हा मयताची पत्नी ही बाहेरगावी गेली होती.

या घटनेची माहिती मिळताच  पोलीसांनी घटना स्थळी जाऊन  ‌पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच  डि.वाय.एस.पी. विवेक लावंड  मुक्ताईनगर यांनी देखील  घटनास्थळी भेट दिली. या खुनामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.