टाटा मेमोरिअल हॉस्पिटलतर्फे बीएस्सी पाससाठी अभिनव उपक्रम

0

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलतर्फे बीएस्सी पाससाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे .

कोर्साचे नाव: ‘Advance Diploma In Medical Imaging Technology’

महाराष्ट्र शासन पुरस्कृत आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली रेडिओलॉजिमध्ये एक्स रे, सिटी स्कॅन, एम आर आय, मॅमोग्राफी आणि कॅथलॅब हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

प्रवेश पात्रता: कोणत्याही विषयातून B Sc उत्तीर्ण असणे आवश्यक.

वार्षिक फिस: १४,००० रुपये  प्रती वर्ष.

निवड प्रक्रिया: इयत्ता १२ विज्ञान विषयातील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयावर Entrance Exam होऊन गुणवत्तेनुसार निवड होईल.

शिष्यवृत्ती: प्रती महिना प्रशिक्षणादरम्यान १२,००० रुपये  stipend देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवाराला टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये किमान एक वर्षासाठी सेवा द्यावी लागेल. या दरम्यान मानधन म्हणून १८,००० रुपये  प्रती महिना देण्यात येईल.

हा अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित उमेदवारास वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि आरोग्य संस्थेत रेडिओलॉजिकल तंत्रज्ञ, रेडिओग्राफर, एक्स रे तंत्रज्ञ, मॅमोग्राफी तंत्रज्ञ, एम आर आय तंत्रज्ञ, कॅथलॅब तंत्रज्ञ, अँप्लिकेशन विशेषज्ञ, रेडिओलॉजिकल सुरक्षा अधिकारी, डायग्नोस्टिक व्यवस्थापक ई. साठी नौकरी करता येईल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर भेट द्या.

https://tmc.gov.in/m_events/events/EventDetail?id=8579&type=4&pg_tp=tr

• ऑनलाईन अँप्लिकेशनची शेवटची तारीख:

२ ऑगस्ट  २०२१

 

Leave A Reply

Your email address will not be published.