मार्च महिन्यात येणार भाजपचं सरकार: नारायण राणेंचा दावा

0

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेते नेहमी बोलत असतात. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकार मार्च महिन्यात कोसळणार असा दावाच नारायण राणेंनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार अशी राजकीय भविष्यवाणी नारायण राणेंनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाहीये त्यामुळे तिथे तसं होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. मार्च महिन्यात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असा बदल दिसून येईल.

नारायण राणे पुढे म्हणाले, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जाहीरपणे गोष्टी गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल आणि मग भाजपचं सरकार येण्याची तारिखही पुढे जाईल.

राणेंच्या भविष्यवाणीवर अनिल परब म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही, संख्या बळावर चालतं आघाडीकडे पूर्ण संख्याबळ आहे आणि हे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल.

वर्षा गायकवाड यांनी नारायण राणेंच्या विधानावर प्रतिक्रिया देत म्हटलं, नारायण राणे पुन्हा सरकार येईल म्हणत असतील यापूर्वी ही काही पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणत आलेत. केंद्रीय मंत्र्याने असे स्टेटमेंट देतांना भान ठेवले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.