श्रीराम माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

श्रीराम माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे दिनेश पाटील, प्रतिभा पाटील, संगिता कुलकर्णी उपस्थित होत्या.

कार्यक्रमात 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर (चित्रकला ) स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत अतिशय सुंदरपणे विचार मांडले. निबंध स्पर्धेत तसेच पोस्टर स्पर्धेत खूप छान प्रकारे चित्र काढले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विदयार्थ्यांना ऑनलाईन व ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रतिभा पाटील यांनी समता, ऐक्य, बंधुता याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. संविधानाचे महत्व सांगितले, तसेच संगीता कुलकर्णी यांनी देखील आपण संविधानाचे महत्व रुजविले पाहिजे असं सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाकर जोश यांनी उद्यापासून सर्व गोष्टींचा अवलंब प्रत्येक विद्यार्थ्याने करावा हे सांगितले. सरस्वती पाटील यांनी उद्देशिकेचे वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अतुल चाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी सन्नो पिंजारी, राजश्री तायडे, अमित तडवी, संजय बडगुजर, भगवान लाडवंजारी, धनंजय सोनावणे, मोतीलाल पाटील यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.