महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांवर ग्राहकाचा हल्ला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांना डोक्यात टिकाव घालून हल्ला करण्याचा प्रयत्न ग्राहकाने केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दुपारी सहायक अभियंता जयेश रजनिकांत तिवारी, कार्यालयीन सहायक योगेश जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे, तंत्रज्ञ मधुकर कांबळे व कंत्राटी कर्मचारी गणेश जगन्नाथ नन्नवरे यांच्यासोबत सिंधी कॉलनी परिसरात थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. या वेळी संंतोषी माता मंदिराजवळील टिकमदास परमानंद पोपटानी यांच्या नावाने असलेल्या वीजमीटरचे २४६० रुपये बिल गेल्या ७५ दिवसांपासून थकबाकी असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिवारी यांनी पोपटानी यांना बिल भरण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान संतपलेल्या किशोर टिकमदास पोपटानी यांनी थेट पथकावर हल्ला चढवला. टिकाव उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न करून झटापट केली. त्यात योगेश जाधव यांच्या कानाला व सोनकांबळे यांच्या पाठीवर दुखापत झाली.

याप्रकरणी तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपटानी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपटानी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.