महाराष्ट्राची चिंता वाढली; ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले असताना आता नवीन ओमिक्राॅन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळं सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलंय. दिवसेंदिवस याचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यांत हा व्हेरिएंट हातपाय पसरत आहे.

महाराष्ट्रात रविवारी सहा रुग्ण सापडले असून राज्यात एकूण 141 वर आकडा पोहचला आहे. त्यामुळं आरोग्य विभागाचं टेन्शनही वाढलंय. यातच आता ओमिक्राॅनची नवनीन गंभीर लक्षणं दिसत आहेत. त्यामुळं चिंतेत आणखी भर पडलीय. यूकेच्या अभ्यासानुसार, जर तुम्हाला सर्दी सारखी लक्षणे आहेत. जसं की, श्वासोच्छोवास करताना फुरफूर आवाज, डोकेदुखी आणि थकवा येणं ही लक्षण असल्यास कोविडच्या ओमिक्रॉन प्रकारासाठी तुम्ही पाॅझिटिव्ह असण्याची शक्यता आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 6,563 नवीन कोविड-19 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलीय. कोविड महामारीच्या सुरुवातीपासून देशातील एकूण रुग्णांची संख्या 3,47,46,838 वर पोहोचलीय. भारतातील सक्रिय केसलोड सध्या 82,267 आहे, तर ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटनमुळे चिंता वाढली असून भारतातील एकूण ओमिक्रॉनची संख्या 578 आहे. त्यामध्ये सर्वाधिक केसेस दिल्ली, महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं आता आरोग्य विभागाचं टेन्शनही वाढलंय.

https://twitter.com/MoHFW_INDIA/status/1475320505972379650?s=20

भारतातील ओमिक्राॅन व्हेरिएंट रुग्णांची संख्या

दिल्ली 142, महाराष्ट्र 141, केरळ 57, गुजरात 49, राजस्थान 43, तेलंगणा 41, तमिळनाडू 34, कर्नाटक 31, मध्य प्रदेश 9, आंध्र प्रदेश 6, पश्चिम बंगाल 6, हरियाणा 4, ओडिसा 4, चंदिगड 3, जम्मू आणि काश्मीर 3, उत्तर प्रदेश 2, हिमाचल प्रदेश 1, लडाख 1, उत्तराखंड 1, एकूण : 578

 

Leave A Reply

Your email address will not be published.