शेतकऱ्यांसाठी चिंताजनक.. हिवाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासुन थंडीचे प्रमाण वाढले आहे. अमरावती, नागपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत कडाक्याच्या थंडीने संपुर्ण मराठवाडा गारठला होता. या थंडीसोबत शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले होते. पण आत रब्बी पिकांचे देखील अवकाळी पावसाने नुकसान होईल.

 हवामान खात्याने दिलेली माहिती

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ डिसेंबरला जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. पाऊसामुळे रब्बी पीक वाहुन जाण्याची किंवा पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पिकांचे नुकसान होणार यामुळे राज्यात शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.