सनी लियोनीला गृहमंत्र्यांची तंबी; दोन दिवसांची दिली मुदत (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बॉलीवूडची प्रसिद्ध सेलिब्रेटी सनी लियोनी हिने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. मात्र आता ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

आताही ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.  तिने ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यावर केलेला डान्स वादग्रस्त ठरला आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह हावभाव आहेत. असं काही संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे सनीच्या विरोधात काही धार्मिक संघटनांनी कोर्टामध्ये देखील धाव घेतली आहे. आता तर तिला थेट मध्यप्रदेशाच्या गृहमंत्र्यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. सध्या त्या गाण्यावरुन चर्चा रंगली आहे.

त्या गाण्यावर मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी आक्षेप नोंदवला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सनी लियोनीच्या त्या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सनी आणि शाकिब तोशीनं जर ते गाणं सोशल मीडियावरुन काढलं नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्या त्या गाण्यावरुन खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर जेव्हा मधुबन मे राधिका नाचे रे हे गाणं व्हायरल झालं तेव्हा त्यावरुन नेटकऱ्यांनी त्या गाण्याला आणि सनीला ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. याउलट काहींनी सनीचं कौतूकही केलं आहे.

सारेगमापच्या वतीनं मधूबन नावाच्या गाण्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये सनीनं मधूबन में राधिका नाचे या गाण्यावर डान्स केला आहे. मात्र काही पंडित आणि धार्मिक गुरुंना तो डान्स आवडलेला नाही. त्यांनी त्याविषयी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सनीनं ज्या गाण्यामध्ये नृत्य केलं आहे ते एक पार्टी साँग आहे.

 

ते कनिका कपूर आणि अरविंद चक्रवर्ती यांनी ते गायलं आहे. मुळ गाणं हे 1960 मध्ये मोहम्मद रफी यांनी गायलं होतं. कोहिनूर या चित्रपटातील हे गाणं आहे. सनीच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये धाव घेणार आहोत. आणि कोर्टाला या गाण्यावर बंदी घालावी म्हणून निवेदन देणार आहोत. अशी माहिती संत नवल गिरी महाराज यांनी दिली आहे. पीटीआयनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. देशाची संस्कृती, परंपरा, आपल्याला ज्या व्यक्ती कायम आदरस्थानी राहिल्या आहेत त्यांची प्रतिमा मलीन करणे यामुळे देशाची बदनामी होत असल्याचे तक्रारदारांचे काम आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.