मलिकांचा गंभीर आरोप; देशमुखांप्रमाणेच माझ्या विरोधातही कट रचला जातोय

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी गृहमंत्री अनिक देशमुख यांच्या प्रमाणेच माझ्या विरोधातही असाच कट रचण्यात येतो आहे. राज्यातील एका मंत्र्याला अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणेकडून सुरू आहे. त्यांच्याविरोधात लवकरच पुरावे मांडणार आहेत.

या पुराव्यांसह मुंबई पोलिस आयुक्त आणि देशाचे गृहमंत्री यांना तक्रार दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या कटकारस्थानाविरोधात मी येत्या दोन दिवसांमध्ये तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणेकडून माझ्यावर पाळत ठेवत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. पण केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी खोटी तक्रार करण्यासाठी माझा ईमेल आयडी पुरवल्याचे अधिकाऱ्यांचे वॉट्स एप चॅट माझ्याकडे आहेत. या पुराव्यांच्या आधारावरच मुंबई पोलिस आयुक्त आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. मला कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे मला नक्कीच न्याय मिळेल, असेही ते म्हणाले. येत्या दिवसांमध्ये याबाबतचा पर्दाफाश करणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील एका मंत्र्याला अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणेकडून सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांबाबतचे पुरावे मी मांडणार आहे. या अधिकाऱ्यांचे वॉट्स एप चॅट माझ्याकडे आहे. मला अडकवण्यासाठी माझा ईमेल दिला जात आहे. अशा कारस्थानातून मला घाबरवण्याचे काम करण्यात येत आहे. पण मला भीती घालण्याचे कारस्थान होत असले तरीही मी डावाला घाबरत नाही. मला पुरावे हाती लागले आहेत, लवकरच या पुराव्यांसह पोलखोल करेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

यह लोग इस गाड़ी में सवार पिछले कुछ दिनों से मेरे घर और स्कूल की ‘रेकी’ कर रहे हैं.

अगर कोई इन्हें पहचानता हो तो मुझे जानकारी दे.

जो लोग इस तस्वीर में हैं, मेरा उनसे कहना हैं कि, तुम्हें मेरी कोई जानकारी चाहिए तो आकार मुझसे मिले, मैं सारी जानकारी दे दूँगा

Leave A Reply

Your email address will not be published.