२६/११ हल्यातील शहिद जवानाचा राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांना पडला विसर

0

यावल, शब्बीर खान, लोकशाही न्यूज नेटवर्क  

२६/११ च्या मुंबई येथील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान स्व. मुरलीधर लक्ष्मण चौधरी  हे मुळ हिंगोणा गावचे रहीवासी असुन त्यांच्या मुंबई येथे कार्यरत असतांना २६/११च्या दहशदवादी हल्यात हिंगोणा ता. यावल येथील रहिवासी  शहीद मुरलीधर चौधरी यांना  प्रथम गोळी लागून वीर मरण आले होते.

देशासाठी आपले बलिदान देणाऱ्या जवानाला एकही राजकीय पदधिकारी किंवा लोकप्रतिनिधीनी आणि अधिकारी यांनी  त्यांच्या मुळ गाव हिंगोणा येथे शहीद स्मारकावर भेट दिली नाही व श्रध्दांजली अर्पण केली नसल्याने  स्व. मुरलीधर चौधरी यांच्या हिंगोणा या गावात त्यांच्या हुतात्मा स्मारकावर  देशासाठी दहशतवाद्यांशी लढतांना विरमरण पावलेल्या शहीद स्मारकास श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी लोकप्रतिनीधी व अधिकारी वर्ग  न आल्याने ग्रामस्थांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, तसेच कोणत्याही राजकीय पद अधिकाऱ्याने हिंगोणा येथे शहीद स्मारकावर भेट का दिली नाही? तसेच त्यांना  अशा देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाला श्रध्दांजली वाहण्यासाठी  वेळ  नाही ?  अशी उलट सुलट चर्चा हिंगोणा गावात रंगली आहे.

माजी आमदार स्व. हरी भाऊ जावळे  यांनी त्यांच्या प्रयत्नातून पाठपुरावा करून  सन २०१८ / १९ मध्ये शहीद स्मारक बांधण्यात आले. तरी गावात  तरुण पिढींना हे स्मारक  नेहमी आठवणीचा उजाळा देत आहे. पण आज रोजी  रावेर यावल तालुक्यातील आमदार शिरीष चौधरी यांनी संविधान दिवसाच्या रोजी सुद्धा हिंगोणा गावामध्ये शहीद स्मारकावर भेट सुद्धा दिली नाही. यामुळे तरुण पिढी व देशप्रेमीमधे नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.