भारत नगरात विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न

0

जळगाव  |  येथील भारत नगरात येथे घरगुती वादातून विवाहितेला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जाणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सावितर वृत्त असे कि,  विकास सोनवणे हे पत्नी निशा विकास सोनवणे आणि मुलगी सायली सोबत राहतात. त्याच्या घरात विकास सोनवणे यांच्यासोबत निताशा बिऱ्हाडे हे महिला गेल्या चार वर्षांपासून राहते. दोन्ही महिला एकाच घरात दोन वेगवेगळ्या रूममध्ये राहतात. त्यामुळे निताशाचे आईवडील आणि भाऊ हे भेटण्यासाठी अधुनमधून येत असतात. २ जुलै रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास निशा सोनवणे ह्या मुलगी सायली सोबत घरी होत्या. त्यावेळी निताशाचे आईवडील व दोन भाऊ (पुर्ण नाव माहित नाही) हे आले. त्यावेळी निताशाचे आईवडील यांनी निशाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तू माझ्या मुलीला विकास सोबत राहू का देत नाही असे म्हणून निशाचा हात पकडून एका भावानाने बाटलीतले पेट्रोल अंगावर टाकेले. तर दुसऱ्या भावाने पेटविण्याचा प्रयत्न केला असता बाजूला उभी असलेली मुलगी सायलीने आरडाओरड केली. त्यामुळे गल्लीतील नागरीक जमा झाले. नागरीकांना पाहून चौघांनी पळ काढला. दरम्यान विवाहिता निशा सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.