जळगावात सलून व्यावसायीकाची आत्महत्या

0

जळगाव : प्रतिनिधी 

सलून व्यावसायीकाने गळफास घेत आत्महत्या केली. गजानन कडू वाघ (35, रा. माळपिंप्री, ता.जामनेर, ह.मु.लक्ष्मीनगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत व्यावसायीकावर कर्ज असल्याने ते फेडण्याच्या विवंचनेत त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावल्याने कर्ज वाढत गेल्याने त्यास कंटाळून राहत्या घरात मध्यरात्री दोरीने गळफास घेत गजानन यांनी आत्महत्या केली. रविवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत गजानन यांच्या पश्चात आई लताबाई, पत्नी सरला, ईश्वर आणि रामेश्वर दोन भाऊ, मुलगा ऋषीकेश (09) व मुलगी वैष्णवी (12) असा परीवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.