भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; अवनीची ऐतिहासिक कामगिरी..

0

टोकियो 

सध्या टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. रविवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक राहिला ठरला. काल भारताने 3 पदकं जिंकली. त्यानंतर आता भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली आहे.

10 मीटर एयर राइफल स्पर्धेत अवनी लेखराने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं आहे. त्याचसोबत या खेळात सुवर्णपदक जिंकणारी अवनी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला 5 पदकं मिळाली आहे.

10 मीटर एयर राइफल स्पर्धेत 249.6 अंकाची कमाई केली आणि पहिल्या स्थानावर राहिली. तर तिची प्रतिस्पर्धी झ्यांग कुपिंग इर्यानाने 248.9 अंक मिळवले. त्यामुळे अवनी आणि झ्यांगमध्ये अखेरपर्यंत लढत रंगली होती. मात्र, अखेर अवनीने अचुक नेम साधत पदक पटकावलं आहे.

दरम्यान, सुवर्णपदक जिंकत अवनीने जागतिक विक्रमाची देखील बरोबरी केली आहे. रविवारी 2 रौप्यपदक तर 1 कांस्यपदक मिळालं. त्यानंतर आता अवनीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तर योगेश काथुनियाने देखील आज थाळीफेकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.