भाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब : असा असेल नवा फॉर्म्युला?

0

मुंबई :  महाराष्ट्रातीलआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीवर तसेच जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपा -१४४, शिवसेना १२६ व अन्य मित्र पक्ष १८ जागांवर लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र सध्यातरी या वृत्तास कोणाकडूनही अधिकृतपणे दुजोरा दिला गेलेला नाही.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक गुरूवारी सायंकाळी दिल्लीत झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक आदी नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये जवळपास 112 उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

अनेक दिवसांपासून महायुतीचं जागा वाटपाचं निश्चित होत नव्हत. अखेर त्याला आज मुहूर्त लागला असल्याचं दिसत आहे. शिवाय महायुतीच्या जागा वाटपांनंतर विरोधीपक्ष देखील त्यांचे काही जागांवरील उमेदवार ठरवणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार यंदाची विधानसभा निवडणुक भाजपा स्वबळावर नाहीतर शिवसेनेला सोबत घेऊन लढणार असल्याच निश्चित मानल जात आहे. यानुसार भाजपा १४४ तर शिवसेना १२६ जागांवर लढेल अशी माहिती आहे. याचबरोबर महायुतीचे मित्रपक्ष रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती सेनेला मिळून १८ जागा देण्यात येणार असल्याचाही निर्णय झाल्याचे समोर येत आहे. रविवारी महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच, शिवसेना-भाजप दरम्यान काही जागांची आदलाबदली होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.