भुसावळात निर्भया महिला सुरक्षा पथकाची स्थापना

0

रोडरोमिओंवर ‘वॉच’ ; रोडरोमियों विरुद्ध पोलीसांचा एल्गार

भुसावळ (प्रतिनिधी)-  शहरात शाळा, महाविद्यालय ,क्लासेस  यासह  विविध ठिकाणी  रोडरोमिओंचा वाढता सुळसुळात आता थांबणार आहे याकरिता अनेकदा त्रस्त पालक , विद्यार्थिनी व  नागरीकांनी तक्रारी दिल्या होत्या याची दखल घेत  भुसावळात निर्भया महिला सुरक्षा पथकाची स्थापना डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी करण्यात आली.

या पथकात महिला आणि पुरूष पोलिस मिळून आठ जणांचा समावेश आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या भोवती या पथकाकडून  गुरुवार पासून कारवाई केली जाणार आहे. यावेळी डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले की निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असून  , निर्भया पथकाला स्वतंत्र वाहन (एम.एच.19 एम. 0668) देण्यात आले आहे पथकातर्फे शहरातील शाळा, कॉलेज तसेच खासगी क्लासेस, टवाळखोर मुले थांबत असलेली ठिकाणे शोधून तेथे दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यत गस्त घालून कारवाई केली जाणार आहे. शिवाय हे  पथक छेडख़ानी करणारे टारगट ,  ट्रीपलसीट मोटर सायकल चालवणार्यांसह कर्कश हॉर्न वाजविणारे वाहन चालक, फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने, विनाकारण शाळा, कॉलेजच्या परिसरात वेगात गाड्या चालविणार्यां विरूध्द कारवाई करणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.