शरद पवार आज ‘ईडीच्या’ कार्यालयात राहणार उपस्थित

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अंमलबजावनी संचालनालयाचया (ईडी) मुंबईतल्या कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहचणार आहेत.

दरम्यान, ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट केली. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

मी स्वत:च शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयात जाणार आहे’, असे पवार यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मात्र, कोणत्याही प्रकरणात एखाद्या व्यक्तीची किंवा आरोपीची चौकशी करण्याचा निर्णय घेणे हा तपासाधिकाऱ्याचा अधिकार असतो. या प्रकरणात ‘ईडी’ने शरद पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. जोपर्यंत अधिकृतपणे चौकशीसाठी बोलाविले जात नाही, तोपर्यंत अभ्यागतांच्या चौकशीचे कोणतेही अधिकार ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना नसतात, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. यामुळे या प्रकरणात ‘ईडी’ची पंचाईत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.