भाजपाला रोखण्याची ताकद पवार यांच्यामधेच,

0

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे प्रतिपादन, साहेबांची भुमिका तळागाळापर्यंत पोचवण्याची गरज

जळगांव.दि.22-
लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाली असून आगामी काळाचे नियोजनासह विचारांचे आदान प्रदान व्हावे तसेच कार्यकर्ते पदाधिकारी यांचेशी चर्चा करण्यासाठी आज संवाद साधत आहे. विद्यमान भाजपा शासनाने सर्वसामान्यांना 15 लाखांचे आमीष दाखवले, कर्जमाफी दिली ती बहुतेकांना मिळालीच नाही, बोंडअळीचे देखिल अनुदान प्रलंबीत आहे, खोटं बोलतं आहेत पण रेटून बोलतं असल्याचे सर्वसामान्य जनतेला आता पुर्णपणे लक्षात आले आहे. भाजपाला रोखण्याची ताकद शरद पवारांमधेच असून साहेबांची भुमिका तळागाळा पर्यत पोचवण्याची आज गरज आहे. असे प्रतिपादन माजी पालक मंत्री तथा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबदार देवकर यांनी कार्यकर्ते पदाधिकार्‍यांशी चर्चा करतांना केले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षकार्यालयात झालेल्या बैठकीत पुढे बोलतांना ते म्हणाले कि, लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभुमीवर अशा परीस्थितीत सर्वसामान्य कार्यकर्ता पदाधिकारी यांच्याशी नेहमीच संपर्कात राहुन सर्वसामान्य नागरीकांना मतदारांना आमीष दाखवले,
प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तालुकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना जबाबदारी निश्चिती करून 23 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत सर्व तालुकावार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यकर्ते हे पक्षाचे आधारस्तंभ आहे. समोरच्या पक्षाचाउमेदवार निश्चित झालेला नाही. त्यांच्यासमोर साम, दाम, दंड, भेद आदीबाबींचा विचार करूनच उमेदवार दिला जाईल. बहुतेक ठिकाणच्या चॅनलवर करण्यात येत असलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधानांच्या विरोधात लाट तयार होत आहे. असेही ते म्हणाले.
संघटनेच्या विश्वासावर शेतकी संघ, विकासो आदि माध्यमातून लोअर कमेटी बुथ आदि ठिकाणी उमेदवार प्रत्यक्ष जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक तालुकाध्यक्षांनी ग्रामीण पातळीवर गावागावात जाऊउन भेटीचे नियोजन करावे पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार वरिष्ठ पातळीच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जातील. स्थानिक प्रश्न, कर्ज माफी, आदी योजना लाभ न मिळालेल्या तसेच पाण्याचा वलंत प्रश्न, विद्यमान शासनाचे निराशाजनक धोरण आदीबाबी जनतेसमोर ठामपणे मांडाव्या, संघटना व पक्ष कार्यकर्त्यांवर भर देण्यात येत असून विधानसभाक्षेत्रप्रमुख निवडले गेले आहे. मतदार याद्या देखील त्याप्रमाणे घराघरापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. भाजपाकडून सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. या संधीचा फायदा मतदारांना मतपेटीपर्यंत रा.काँ. च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेऊन जाण्याची गरज आहे. जळगाव, शेंदुर्णी, जामनेर, धुळे, नगर, आदी नगरपालिका, महानगरपालिका कोणत्या बळावर निवडून आले आहे. राफेलमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आगामीकाळात एनडीएचे सरकार येणार नाही. त्यांना केवळ 62 जागा मिळू शकतील तर उत्तर प्रदेशात केवळ 5 जागा मिळू शकतील अशी सध्याची परिस्थिती आहे. असे माजी खासदार ईवरलाल जैन, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, भुसावळचे राजेंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी खासदार वसंतराव मोरे, अ. गफ्फार मलिक, विलास पाटील, माजी आ. अरूण पाटील, ललीत बागुल, रमेश पाटील, सोपान पाटील, मंगला पाटील, कल्पीता पाटील, कल्पना पाटील, लता पाटील, शिक्षक संघटनेचे सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.