महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे कलेक्टोरेटवर धरणे

0

जळगांव.दि-21-
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीने केंद्र व विद्यापीठ अनुदान आयोगाने राबवलेल्या 13 बिंदू नामावलीचा निर्णय रद्द करण्यासह आदी मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा.सी.पी.लभाणे, प्रा.के.के. वहवी, प्रा. डॉ.वासूदेव वेले, प्रा. सरला तडवी, प्रा. एन.एस.तायडे, प्रा. डॉ.शरद बिर्‍हाडे, प्रा. डॉ.ए.व्हि.वाकोडे, प्रा. ए.एस.इंगळे, प्रा. ए.एस.इंगळे, प्रा. पंचशिला वाघमारे, प्रा. एस.पी.तडवी आदींसह तिनही जिल्ह्यातील प्राध्यापक सहभागी झाले होते. प्राध्यापकांच्या जागा ीरती संबंधात बिंंदू नामावलीत विभागवार आरक्षण असावे, उच्च न्यायालय निर्णयानुसार सर्व विद्यापिठ महाविद्यालयीन स्तरावर 13 बिंदू नामावलीचा निर्णय राबवण्याचा निर्णय घेण्यात यावा असे निर्देशित केले आहे. परंतु 13 बिंदू नामावलीचा निर्णय मागासवर्गीयांच्या विरोधात अन्यायकारक आहे.या निर्णयास संघटना विरोध करीत असून तो रद्द करण्यात यावा व मागासवर्गीयांना न्याय द्यावा यामागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.