शेंदुर्णी येथे श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

0

समाज बांधवांनी मंगल कार्यालय बांधणीचा केला संकल्प
शेंदुर्णी, ता.जामनेर | प्रतिनिधी
श्री.संत शिरोमणी नरहरी सोनार यांची 733 वी पुण्यतिथी सोहळा सुर्वणकार प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला .सकाळी पंकज वडनेरे यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची महापुजा व श्री कडोजी महाराज मंदिरामध्ये श्री .नरहरी महाराजांच्या मुर्तीचा आभिषेक व आरती करण्यात आली .नंतर गावातील प्रमुख मार्गानी सुर्वर्णकार समाज बांधवांनी पालखी काढण्यात आली . यामध्ये गावामधील महिला व पुरुष भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. अथर्व श्रीपाद विसपुते यानी संत नरहरी महाराज यांची वेषभूषा केली होती .महिला व पुरुषांनी फुगडी , भजने , अंभगे, गात पालखी सोहळ्याची
मोठ्या भक्तीमय वातावरणात टाळमृदूगाच्या गजरात कडोजी महाराज मंदिरात सोहळ्याची सांगता झाली. संत नरहरी महाराजांच्या नामाच्या गजराने सपूर्ण परिसर दुमदुमला होतो
श्री त्रिविक्रम भगवान मंदिरामध्ये रात्री हभप निवृती महाराज (हवालदार )म्हाळसा पिंप्रीकर यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले. किर्तनाच्या सुरुवातीला पुलवामामध्ये शहिद झालेल्या विरजवानांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली .सुवर्णकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद विसपुते यांच्या हस्ते हभप निवृत्ती महाराजांचा सत्कार करण्यात आला . तर भजनी मंडळाचा सत्कार राजेंद्र विसपुते यांनी केला .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय विसपुते यांनी केले . तर आभार महेश बिरारी यांनी मानले .कार्यक्रमाला महिला पुरुष भाविक भक्त मंडळी , बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.