भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय; महाविकास आघाडीची मते फुटली

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर दणदणीत विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीची 49 मते फुटल्याचे दिसून येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली.

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहे. काँग्रेसने अगोदर भाजपमधून आलेल्या रवींद्र भोयर  यांना तिकीट दिले होते. मात्र, त्याला काँग्रेसमधूनच विरोध झाल्याने ऐन मतदानाच्या अगोदर महाविकास आघाडीने भोयर यांची उमेदवारी मागे घेऊन अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपला त्याचा काहीही फरक पडला नाही.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यामुळं ते विजयी झाले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झाली. या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. यात 283 महिला आणि 271 पुरुष मतदारांचा समावेश होता. एकूण 560 पैकी 554 मतदारांनी मताधिकार बजावला होता.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाबरोबरच महाविकास आघाडी व अपक्षांची मते मिळवून दणदणीत विजय मिळविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.