प्रवाशांसाठी महत्वाची बातमी.. रविवारी आणि साेमवारी ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मध्य रेल्वे ठाणे-दिवा 5 व्या आणि 6 व्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळांना जोडण्यासाठी कळवा आणि दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक रविवारी (दि.२) रात्रीपासून सोमवारी (दि.३) पहाटे २ पर्यत असेल. यामुळे रविवारी ३, तर साेमवारी ११ गाड्या रद्द झाल्या आहेत.

१ जानेवारीला रात्री ११.५२ ते २ जानेवारीच्या रात्री ११.५२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

या गाड्यांचे शाॅर्ट टर्मिनेशन 

१ जानेवारीला सुटणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस दादर ऐवजी पुण्याहून साेडण्यात येईल. १ जानेवारीला सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुणे हून सुटेल.

 रद्द झालेल्या रेल्वे गाड्या 

शनिवारी (१ जानेवारी) १२११२ अमरावती-मुंबई, १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम, १७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस, तर रविवारी (दि.२) अप-डाऊन मुंबई-पुणे डेक्कनक्विन, अप-डाऊन मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी, अप-डाऊन मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी, अप-डाऊन मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, अप-डाऊन मुंबई-पुणे-मुंबई डेक्कनक्वीन, मुंबई-अमरावती, अप-डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम, मुंबई-गदग एक्सप्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस धावणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.