पोलिसांनी काढला अजब फतवा.. ‘पंतप्रधान मोदी येताय, ४ दिवस खिडकीत कपडे वाळत घालू नका’

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीही मागील काही काळामध्ये अनेकदा उत्तर प्रदेशला गेले. आता पुन्हा एकदा मोदी २२ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र यावेळी त्यांच्या दौऱ्यापेक्षा इथल्या पोलिसांनी लोकांसाठी दिलेल्या निर्देशांची सध्या जास्त चर्चा होताना दिसत आहे.

पंतप्रधानांच्या या कार्यक्रमासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारी पोलिसांनी याच आठवड्यावपासून सुरु केली . मात्र याच तयारीसंदर्भात पोलिसांनी जारी केलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. मोदींचा सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी या भागातील लोकांना १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान खिडकीमध्ये, बाल्कनीत कपडे वाळत घालू नका असे निर्देश दिले आहेत. पोलिसांच्या या निर्देशाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लखनऊमध्ये मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी असलेल्या सरस्वती अपार्टमेंटला गोमतीनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये मोदींचा दौरा होईपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा उल्लेख केलाय. तसेच स्थानिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलच्या सूचना देण्यात आल्यात. पण या सूचनांमध्ये एक सूचना कपडे वाळत घालण्याबद्दल आहे. कपडे बाहेर वाळत घालू नका, असे या पत्रात म्हटले.

पंतप्रधान गोमतीनगर पोलीस मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या भागामधील कार्यक्रमस्थळी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या भागामधील सर्व उंच इमारतील आणि टॉवर्सला सूचना केल्या जात आहेत. यामध्ये सरस्वती अपार्टमेंट थेट पोलीस मुख्यालयाच्या समोर असल्याने तुम्हालाही यासंदर्भात सूचना करण्यात येत आहे, असे पोलिसांनी इमारतीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ७०० हून अधिक जणांनी ते शेअर केले असून साडेतीन हजारांहून अधिक जणांनी ते लाइक केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.